बेळगाव / प्रतिनिधी
कारवार येथील उद्योगपती नायक यांच्या हत्येप्रकरणी बेळगावच्या हिंडलगा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुन्हेगार बन्नंजे राजा याची प्रकृती अचानक बिघडल्याने आज बेळगाव जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्याचे स्कॅनिंग करण्यात आले. बन्नंजे राजा हा अंडरवर्ल्डशी संबंधित कुख्यात गुन्हेगार असल्याने तपासणी दरम्यान जिल्हा रूग्णालयाबाहेर सशस्त्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तत्पूर्वी त्याने प्रकृती बिघडल्याची तक्रार केल्यानंतर हिंडलगा तुरुंग प्रशासनाची धावपळ उडाली. यानंतर सकाळी कारागृह पोलिसांनी त्याला कडेकोट बंदोबस्तात बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणले. यानंतर डॉक्टरांकरवी त्याचे सिटी स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा कडेकोट बंदोबस्तात कारागृहात नेण्यात आले.
0 Comments