सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित, ब्रह्मलिंग हायस्कूलमध्ये मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रारंभी शेतकरी शिक्षण सेवा समितीचे संचालक श्री. अशोक चंद्रू पाटील व श्री. कृष्णा ओ. पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन झाल्यावर संस्थेचे अध्यक्ष श्री. देवाप्पा ठाणू पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

याप्रसंगी क्रीडा विभाग व सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे तुरमुरी (ता. बेळगाव) येथे घेण्यात आलेल्या उचगाव विभागीय क्रीडा स्पर्धेत सांघिक खो-खो आणि थ्रोबॉल स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या संघांसह वैयक्तिक क्रीडा प्रकारात १०० मी. धावणे (प्रथम क्रमांक) प्राप्त गणेश कोवाडकर, गोळाफेक (प्रथम क्रमांक) प्राप्त नम्रता मंडलिक, ८०० मी. धावणे (द्वितीय क्रमांक) प्राप्त प्रेम बंडू सांगावकर,  १०० मी. धावणे (द्वितीय क्रमांक) प्राप्त अतुल पाटील,  गोळा फेक (तृतीय क्रमांक) प्राप्त सुशांत पाटील,  ३००० मी. आणि ४०० मी. धावण्यात (तृतीय क्रमांक) प्राप्त प्राची मनोहर पाटील यांना मान्यवरांच्याहस्ते प्रशस्तीपत्रक व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. भाऊराव गडकरी, सेक्रेटरी श्री. बी. डी. पाटील, संचालक श्री. अशोक चंद्रू पाटील, श्री. कृष्णा ओ. पाटील, श्री. प्रकाश महादेव पाटील, श्री. प्रकाश लक्ष्मण पाटील, श्री. आर. एन. हुलजी, श्री. यल्लाप्पा कलखांबकर, ग्रामस्थ - श्री. परशराम अधिकारी, श्री. बाळू धोंगडे, श्री. मारुती कणबरकर, श्री कृष्णा म. पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. पी. एम. मुतगेकर, न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. पुनम बा. पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.