बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव तालुक्यासह शहर परिसरातील विविध सार्वजनिक मंडळ आणि शैक्षणिक संस्थांच्यावतीने मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ७७ वा. स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
- स्वयंभू युवक मंडळाच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा -
ओंकारनगर टीचर्स कॉलनी क्रॉस नं. ४ हिंडलगा, बेळगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव स्वयंभू युवक मंडळाच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.नगरसेविका विणा विजापुरे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी कॉलनीतील सर्व युवक आणि रहिवासी उपस्थित होते.
- गीतास लव्हडेल नर्सरीत स्वातंत्र्य दिन साजरा -
हिंडलगा दाजीबा देसाई मार्गावरील गीतास लव्हडेल नर्सरी येथेही ७७ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य रवी भुते आणि दुर्गा भुते यांच्याहस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुलांना चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
0 Comments