सुळगा (हिं.) / वार्ताहर
बेळगांव तालुका विविध कार्यकारी संघ लि. सुळगा (हिं.) च्या सुळगा (हिं.) (ता. बेळगांव) येथील मुख्य कार्यालयात मंगळवार दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. संघाचे अध्यक्ष श्री. अशोक यल्लाप्पा पाटील, [संस्थापक, चेअरमन बेळगाव तालुका विविध कार्यकारी संघ, सुळगा (हिं.)] हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी श्रीमती अनिता यल्लाप्पा कलखांबकर यांच्याहस्ते प्रतिमा पूजन तर उपस्थित मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
यानंतर श्री. यल्लाप्पा भरमा पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रकाश गुंडोजी बेळगुंदकर यांनी केले तर श्री.एन वाय.चौगुले यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, कर्मचारी यांच्यासह श्री. टोपाण्णा परशराम पाटील, श्री. शिवाजी गा. पाटील, श्री. लक्ष्मण ग. चौगुले, सौ. सुनीता प्र. बेळगुंदकर, सौ. ज्योती जो. चौगुले, मानसी इराप्पा खांडेकर, कु. यल्लाप्पा शिवाजी बाळेकुंद्री आदि उपस्थित होते.
0 Comments