बेळगाव तालुक्यासह शहरात परिसरात कौटुंबिक व सामाजिक स्तरावर बहीण भावाच्या मंगलमय आणि पवित्र प्रेमाचा रक्षाबंधन सण उत्साहात पार पडला. सर्व बहिणींनी आपल्या भावाला राखीचा धागा बांधत आपल्या भावाला दिर्घायुष्य लाभूदे अशी मोनोभावें प्रार्थना केली. या बहीण भावाच्या अतूट नात्यामध्ये आनंद आणि उत्साह ओसंडून वहात होता.
- कौटुंबिक रक्षाबंधन -
रक्षाबंधन आणि दिपावलीतील भाऊबीज हे दोन सण बहीण भावाच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक आहेत. या दोन सणात बहीण भावाला ओवाळण्यासाठी व राखी बांधण्यासाठी आतुर झालेली असते. अगदी बहीण सासरी जरी असेल तरी आपल्या भावासाठी माहेरी धाव घेऊन राखीचा धागा बांधत आपले नाते मजबूत करते. या दिवशी बहीण भावाला राखी बांधून भावाला मनोभावे ओवाळते. व दिर्घायुष्य मागितले जाते. या वेळी गोड धोड पदार्थ देण्यात येतात व तोंड गोड केले जाते.
- चिमुकल्यांचे रक्षाबंधन -
रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणींची भावाला राखी बांधण्यासाठी लगबग दिसून आली. तर काही ठिकाणी भाऊ ही आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी जात असल्याचे चित्र पहायला मिळाले. काहींनी सणाचे औचित्य साधून फॅमिली गेट टुगेदरच्या माध्यमातून एकत्रित येत आनंद द्विगुणित केल्याचे दिसून आले.
एकंदरीत अतिशय पवित्र प्रेमाचा आणि एकमेकांबद्दल माया, ममता, प्रेम व्यक्त करणारा बहीण भावाच्या नात्यातील वीण दृढ करणारा रक्षाबंधन सण सर्वत्र आनंदात साजरा करण्यात आला.
- शैक्षणिक संस्थांमधील रक्षाबंधन -
- गीतास लव्हडेल नर्सरी येथेही रक्षाबंधन सण साजरा -
कुटुंबाप्रमाणे विविध शैक्षणिक संस्थामध्येही बुधवारी रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हिंडलगा दाजीबा देसाई मार्गावरील गीतास लव्हडेल नर्सरी येथेही लहान मुलांनी हा सण आनंदात साजरा केला. लहान मुलींनी छोट्या मुलांना राखी बांधली. तर मुलांनी रक्षाबंधनाची भेट म्हणून मुलींना आकर्षक गिफ्ट्स दिली.
खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी याप्रसंगी नर्सरीतील सर्व शिक्षिका - महिला शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments