- सौंदत्ती पोलिसांची कारवाई
सौंदत्ती / वार्ताहर
येक्केरी (ता. सौंदत्ती जि. बेळगाव) बेकायदा गांजा विक्री करणाऱ्या एकाला सौंदत्ती पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या व्यक्तीकडून २ हजार रू. किंमतीचा गांजा, ६०० रुपयांची रोख रक्कम आणि ५ हजार रू. किंमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार सौंदत्ती तालुक्यातील येक्केरी गावातील एका पानशॉपवर अवैध अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची अचूक माहिती सौंदत्ती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल विभागासह पोलिसांनी धाड घालून ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक करुणेश गौडा, तहसीलदार एम.एन. हेग्गनवर, हणमंत वसन, संतोष जाधव कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.
0 Comments