•  ना. धों. महानोर - हरी नरके यांना अर्पण करणार श्रद्धांजली 

बेळगाव : रानकवी ना. धों. महानोर व ज्येष्ठ साहित्यिक हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज शुक्रवार दि. ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी वक्ते म्हणून प्रा. चंद्रकांत पोतदार उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मैणसे असतील. 

गिरीश काँप्लेक्स, रामदेव गल्ली, कार पार्किंग एरिया येथे हा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे.