•  गळफास घेऊन संपविले जीवन 

रायबाग / वार्ताहर  

केएसआरटीसी परिवहनमध्ये कार्यरत असलेल्या एका वाहतूक निरीक्षकाने बसस्थानक आगारातच आत्महत्या केली. रायबाग (जि. बेळगाव)  शहरातील बस स्थानकावर गुरुवारी रात्री उशिरा ही घटना घडली. शिवानंद बजंत्री (वय ४८, रा. मूळचे सुनाडोली, ता. गोकाक, सध्या रा. चिक्कोडी) असे आत्महत्या केलेल्या वाहतूक निरीक्षकाचे नाव आहे.

रात्री काम संपवून बसस्थानक इमारतीच्या पहिल्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याच्या खिडकीला गळफास घेऊन त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा हा प्रकार वाहतूक कर्मचारी स्थानकावर आल्यानंतर उघडकीस आला. दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी रायबागच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद रायबाग पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.