बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिरानजीकच्या जुन्या तलावात दोन मृतदेह आढळून आले आहेत. दोन मृतदेहांपैकी एक पुरुष  आणि स्त्री असल्याचे प्राथमिक दृष्ट्या आढळून येत आहे.

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार बुधवारी पहाटे कपिलेश्वर मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या तलावामध्ये दररोज पोहायला जाणाऱ्या मुलांना दोन मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

खडेबाजार पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. हे मृतदेह कोणाचे आहेत त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.