सुळगा (हिं.) / वार्ताहर

सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील बालाजी मल्टीपर्पज को - ऑप. सोसायटी लि. तर्फे आज दि. १५ ऑगस्ट रोजी स्वतंत्र भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. 

ध्वजारोहण सोहळ्यासाठी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक मंडळ पदाधिकारी कर्मचारी, शाळकरी विद्यार्थी - विद्यार्थिनी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रारंभी लक्ष्मण मारुती कलखांबकर यांच्याहस्ते प्रतिमा आणि ध्वजपूजन करण्यात आले. यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोज कलखांबकर यांच्यासह उपाध्यक्ष श्री.अजित कलखांबकर आणि पदाधिकाऱ्यांच्याहस्ते दीपप्रज्वलन  झाल्यानंतर प्रकाश गणपत पोटे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 



याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अजित कलखांबकर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 


यावेळी संस्थेच्या वतीने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी - विद्यार्थिनींना खाऊ वाटण्यात आला.चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली