- प्रत्येकी २ लाख रु. नुकसान भरपाई मंजूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- लक्ष्मीताई फाऊंडेशनतर्फेही आर्थिक मदत
बेळगाव / प्रतिनिधी
पाणी गरम करण्याची कॉईल काढतेवेळी विजेचा धक्का लागल्याने आजोबा - आजीसह नातीचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लागलीच 'त्या' दुर्घटनाग्रस्त कुटुंबाची भेट घेतली आणि सांत्वन करून त्यांना धीर दिला. तसेच सरकारकडून प्रत्येकी २ लाख रु. नुकसान भरपाई मंजूर करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव शहरातील आझमनगर येथे आज शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. पाणी गरम करण्याची कॉईल काढतेवेळी विजेचा धक्का बसून इराप्पा गणगप्पा लमाणी (वय ५०), पत्नी शांता (वय ४५) आणि अन्नपूर्णा मुन्नाप्पा लमाणी (वय ७, सर्वजण रा. रामदुर्ग तालुका अरबेंचीतांडा) या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मुख्यमंत्र्यांनाही सदर घटनेची माहिती दिली आणि प्रत्येक व्यक्तीसाठी २ लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्याची विनंती केली. याशिवाय लक्ष्मीताई फाऊंडेशनतर्फे आर्थिक मदतही करण्यात आली.
0 Comments