• विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील घटना

विजयपूर / वार्ताहर 

विजयपूर जिल्ह्याच्या मुद्देबिहाळ तालुक्यातील हदलगेरीरोड नजीक सीवरेज डेव्हलपमेंट (मलनिस्सारण) बोर्डाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी एका घरात  सेंट्रिंग मजूर संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आला आहे. अमजद हाजीसाब वालीकर (वय ५२) असे मृताचे नाव आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्यासह एकाच खोलीत झोपलेल्या तीन कामगारांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. विजयपूर जिल्हा मुख्यालयातून विशेष गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान डीवायएसपी करुणाकर शेट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन  पंचनामा केला. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मुद्देबिहाळच्या सरकारी रुग्णालयात पाठविला. या घटनेची नोंद मुद्देबिहाळ पोलिस स्थानकात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.