- इंडी ग्रामीण पोलिसांची कारवाई
विजयपूर / वार्ताहर
विजयपूर जिल्ह्याच्या इंडी शहरात बेकायदा देशी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. मल्लाप्पा भंडारी (रा. लच्चान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून एक देशी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.इंडीचे पोलीस उपनिरीक्षक सोमेश गेज्जी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने प्राप्त माहितीच्या आधारे शहरातील रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून ही कारवाई केली.या प्रकरणाची नोंद इंडीच्या ग्रामीण पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments