•  मार्केट पोलिसांची कारवाई 

बेळगाव / प्रतिनिधी

मार्केट पोलीस स्थानकाच्या हद्दीत खडेबाजार मार्गावर पार्क केलेल्या दुचाकी चोरी प्रकरणी आज २४ ऑगस्ट रोजी  गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तपास करून दोन चोरट्यांना मार्केट पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष शिवप्पा बेव्हिकोप्प (वय २९ रा. इंचल सौंदत्ती) आणि अबूबकर सिकंदर सवदी (वय २१ रा. श्रीनगर गार्डन बेळगाव) अशी अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ स्प्लेंडर, १ सीडी डिलक्स, १ अॅक्टिवा आणि १ हिरो मेस्ट्रो अशा एकूण  २ लाख ४० हजार रु. किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

मार्केट पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  एन. व्ही. बरमनी, मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक महांतेश के. धम्मन्नावर यांच्या नेतृत्वाखालील सहकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.