बेळगाव : अखिल भारत गंधर्व विद्यालयाच्या २०२३ मध्ये संपन्न झालेल्या संगीत विशारद परीक्षेमध्ये स्थानिक स्वरसाधना संगीत विद्यालयातील सुमन पाटील, सीता बैलकेरी,वंदना कुलकर्णी, जानकी घोरपडे, राजश्री खोपर्डे या विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. तर  रेखा अब्बाई या विद्यार्थिनीने विशेष श्रेणीत स्थान मिळविले आहे. यश संपादन केलेल्या विद्यार्थीनींना सीमा कुलकर्णी यांनी संगीत प्रशिक्षण दिले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मुख्याद्यापकांनी विशेष कौतुक केले आहे