खानापूर / प्रतिनिधी

अवरोळी (ता. खानापूर) येथील गोलीहळळी वन्य प्रदेशाच्या हद्दीत गव्याची शिकार केल्याप्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सोमनिंग रवळप्पा कोडोली आणि प्रभू नडाप्पा कोडोली दोघेही (रा.अवरोळी;ता.खानापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना गोलीहळळीच्या वनअधिकारी वनश्री हेगडे यांनी न्यायालयासमोर हजर केले.

बेळगाव विभागाचे उपवनसंरक्षक कल्लोळ आणि उपविभागीय वनसंरक्षक मल्लिनाथ कुसनाळ यांच्या नेतृत्वाखाली उपवनाधिकारी संजय मगदूम, अशोक हुली, कुमारस्वामी हिरेमठ  यांच्यासह गस्ती वनापाल अजय भास्करी , गिरीश मक्केद, वीरप्पा करलिंगनवर, बी.ए. माडिक आदींनी ही कारवाई केली.