- अध्यक्षपदी सरिता पाटील ; उपाध्यक्षपदी चेतना कांबळे
चिक्कोडी / वार्ताहर
चांदूर (ता .चिक्कोडी) येथील चांदूर ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षपदी सरिता पाटील व उपाध्यक्षपदी चेतना अशोक कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अडीच वर्षांच्या कालावधीकरिता चांदूर ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला तर उपाध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीतील सर्वसाधारण प्रवर्ग असे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सरिता शारदा पाटील व चेतना अशोक कांबळे या दोघी रिंगणात असल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी प्रवीण पाटील यांनी जाहीर केले.
यावेळी उपसभापती आकाश कृष्णा कांबळे, अशोक जमदाडे, शारदा पाटील, सिद्धगौडा मगदूम, युवराज पाटील, गोपाळ मगदूम, कृष्णा मगदूम, श्रीराम घाटगे, अप्पासाबा घाटगे, विष्णू पाटील, बाळकृष्ण पाटील, पूजा कांबळे, चंद्रकांता मगदूम, सुरेखा पाटील, वैशाली पाटील, पीडीओ अशोक होनवाड, सचिव अप्पासाबा मुल्ला व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments