• चिक्कोडी पोलिसांची कारवाई 

चिक्कोडी / वार्ताहर 

चिक्कोडी तालुक्‍याच्या कब्बूर शहरातील बेल्लद बागेवाडी रस्त्यानजीक चिक्कोडी उपकालव्याच्या बाजूला एकाचा खून करून मृतदेह टाकण्यात आला होता. या प्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. चिक्कोडी डीवायएसपी बसवराज यलीगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील, उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली यांच्यासह सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. 

भीमन्ना मुन्नोळी (वय ५१ रा. शिरहट्टी केडी ; ता.हुक्केरी) असे मृताचे  तर वासू अर्जुन माळींगे आणि सिद्धप्पा लगमप्पा माळींगे (रा.शिरहट्टी - केडी ,ता. हुक्केरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

या प्रकरणी चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून कसून तपास केला असता वासू अर्जुन माळींगे आणि सिद्धप्पा लगमप्पा माळींगे यांनी  दारूच्या नशेत भीमन्नाचा खून करून मृतदेह कब्बूर शहरातील सीबीसी कालव्याजवळ फेकून दिल्याचे स्पष्ट झाले.