• बसूर्ते येथे शेतात भात लावणी करताना घडली घटना 

बेळगाव / प्रतिनिधी 

शेतात भात लावणी करताना सर्प दंश झाल्याने एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. बसूर्ते (ता. बेळगाव) येथे आज बुधवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. लक्ष्मण सोमान्ना घुमठे (वय ६० रा. छ्त्रपती शिवाजी महाराज चौक बसुर्ते) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, बुधवारी लक्ष्मण हे शेतात भात लावणी करण्यासाठी गेले होते लावणी करताना दुपारी १ वा. सुमारास त्यांना सर्पदंश झाला. या घटनेनंतर अधिक उपचारासाठी तातडीने लक्ष्मण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. लक्ष्मण यांच्या निधनाने घुमठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे मुलगी असा परिवार आहे.