बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर व उपनगरातील दुचाकी चोरी प्रकरणी एका युवकाला अटक करण्यात खडे बाजार पोलिसांना यश आले आहे. सर्फराज मुल्ला (वय ३४, खुदादाद गल्ली, न्यू गांधीनगर) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १ लाख १८ हजार रू. किमतीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
३० ऑक्टोबर २०२२ रोजी रामलिंग खिंडगल्ली येथील एका शॉपिंग मॉल समोरून दुचाकी चोरीला गेली होती. यासंबंधी ३ फेब्रुवारी २०२३ रोजी खडेबाजार पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे तपास करून पोलिसांनी सर्फराजला अटक करून त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या आहेत. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, एस. बी. गुंडलूर, बी. एस. रुद्रापूर, आर. बी. गनी, एम. व्ही.अरळगुंडी, व्ही. वाय. गुडीमेत्री, जी.पी.अंबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
0 Comments