- गेल्या १० दिवसात आमगावात २३९८ मि.मी तर कणकुंबीत २२७८ मि.मी पावसाची नोंद
खानापूर / प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पश्चिम घाटातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी सकाळी ८ वाजता शेवटच्या २४ तासात कणकुंबी येथे १४३ मि. मी पावसाची नोंद झाली आहे तर जांबोटी येथे ९५ मि. मी. लोंढा विभागात ८८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे तर खानापूर परिसरात केवळ ३६ मि. मी. कक्केरीत ३१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील आमगावात आतापर्यंत गेल्या नऊ दिवसात २३९८ मि. मी. पाऊस झाला असून जवळच्या कणकुंबीत २२७८ मि. मी. पाऊस झाला आहे. यंदा पावसाच्या बाबतीत खामगावला कणकुंबीचे आव्हान मिळाल्याचे दिसून येत आहे.
कणकुंबी परिसरात गेल्या नऊ दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. या काळात आमगावात १५३१.०६ मि. मी. तर कणकुंबीत १३२७.०८ मि. मी. पाऊस झाला आहे. यानंतर मंगळवारी ही कणकुंबीत १३८ मि. मी. तर बुधवारी सकाळी आठ वाजता शेवटच्या २४ तासात १३८ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
मलप्रभा नदीसह अन्य नद्या, नाले ओढे भरून वाहत आहेत. मलप्रभा नदीच्या काठावरील मारुती मंदिर गेल्या चार दिवसांपूर्वी पाण्याखाली गेले आहे. असाच पाऊस सुरू राहिल्यास शेतातील पीक कुजण्याची भिती आहे. या भागात सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे वीज पुरवठा खंडित होत असून या भागातील लोकांना अंधारात दिवस काढावा लागत आहे. एकंदरीत संततधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
- गेल्या नऊ दिवसातील पाऊस -- तारीख आमगाव कणकुंबी
- १६ जुलै ८०.२ ८७
- १७ जुलै ९०.४ ७२.४
- १८ जुलै १००. ० ७७.६
- १९ जुलै २४० २३५
- २० जुलै १४० १०६.४
- २१ जुलै २१०. २ २०५
- २२ जुलै १८०.४ १५७. २
- २३ जुलै २००. ४ १६८. २
- २४ जुलै २९० २१९
- एकूण १५३१.६ १३२७.८
0 Comments