- रेल्वे वाहतुक अन्य मार्गाने
बेळगाव / प्रतिनिधी
रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. पंधरा दिवसात दुसऱ्यांदा दरड कोसळण्याची घटना करंझोळ नजीक घडली आहे. काल मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास केसरलॉक ते करंझोळ या दोन रेल्वे स्थानकादरम्यान दरड कोसळली आहे. दरम्यान, या घटनेमुळे यशवंतपूर-वास्को-द-गामा (ट्रेन क्र. 17309) आणि वास्को-द-गामा-यशवंतपूर (ट्रेन क्र. 17310) या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत दरड हटविण्याचे व मातीचा भराव रेल्वे मार्गावर आल्याने तो बाजूला करण्यासाठी काम युद्धपातळीवर सुरु होते.
परिणामी वास्कोहून सुटणारी हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 12779) कोकण रेल्वेमार्गे वळवली आहे. ही रेल्वे आज २६ जुलै 2023 रोजी मडगाव, फातोर्डा , मडुरे, रोहा, पनवेल, कर्जत, लोणावळा आणि पुणे स्थानकांद्वारे धावणार आहे. सावर्डे, कुडतरे, कुळे, कॅसल रॉक, लोंढा, बेळगाव, घटप्रभा, मिरज, सांगली, कराड, सातारा स्थानकावरील थांबे वगळण्यात आले आहेत अशी माहिती हुबळीच्या नैऋत्य रेल्वे विभागाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अनीश हेगडे यांनी दिली.
0 Comments