• तालुक्यात पावसाची संततधार सुरूच : पाच बंधारे पाण्याखाली

(मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील झांबरे धरण ओव्हरफ्लो)

चंदगड / प्रतिनिधी 

चंदगड तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील झांबरे परिसरात सुरू असलेला प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे. सदर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुराचा धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे नदी काठावरील ग्रामस्थांनी सतर्क रहावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

याशिवाय घटप्रभा नदीवरील पिळणी, भोगोली, कानडी, सावर्डे अडकूर हे पाच बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

(मुसळधार पावसामुळे ताम्रपर्णी नदीवरील कोनेवाडी बंधारा पाण्याखाली)