- विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील घटना
विजयपूर / वार्ताहर
शॉर्टसर्किटमुळे दुचाकीला आग लागून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. विजयपूर जिल्ह्याच्या चडचण तालुक्यातील इळगी क्रॉसनजीक, चडचण पोलिस स्थानकाच्या हद्दीत आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संतोष करजगी (वय ३८, रा. चडचण) असे या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. चडचणच्या सरकारी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहिती अशी की, संतोष करजगी आज दुपारच्या सुमारास दुचाकीने इळगीहून चडचणकडे निघाला होता. यावेळी इळगी क्रॉसनजीक आला असता इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन दुचाकीला अचानक आग लागली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. यानंतर स्थानिकांनी लागलीच चडचण पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच चडचण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तसेच जखमी संतोषला अधिक उपचारासाठी चडचणच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणाची नोंद चडचण पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
0 Comments