- विश्वहिंदू परिषद, बजरंगदलाची मागणी
- निषेध मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहरात आज विश्वहिंदू परिषद, बजरंगदलाच्यावतीने हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत जैन आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
प्रारंभी शहरातील कन्नड साहित्य भवनापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. ५ जुलै रोजी जैन मुनींची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्याप्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले.
या मोर्चात तेजा प्रति भीमपीठाचे हरिगुरु महाराज, केदारपीठाच्या मुत्नाळ शाखेतील शिवानंद शिवाचार्य स्वामीजी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा भट्ट, विविध स्वामीजी यांच्यासह यामध्ये हजारोंच्या संख्येने जैन बांधव आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते .
0 Comments