बेळगाव / प्रतिनिधी 

हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत जैन आश्रमातील जैन मुनी कामकुमार नंदी महाराजांच्या ५ जुलै रोजी झालेल्या हत्येची अधिक चौकशी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी सदर प्रकरणातील आरोपी नारायण माळी आणि हसन दलायत या दोघांना बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून  चिक्कोडी पोलिस उपअधिक्षक बसवराज यलीगार, पोलिस निरीक्षक आर.आर.पाटील यांना पथकाने ताब्यात घेतले. दोन पोलीस निरीक्षक, एका डीआर पथकाच्या बंदोबस्तात सदर आरोपींना  चिक्कोडीला रवाना करण्यात आले. या घटनेने संपूर्ण राज्यात एकच खळबळ माजली आहे. 

हिंडलगा कारागृहातून त्यांना आरोग्य तपासणीसाठी चिक्कोडी तालुका रुग्णालयात नेण्यात आले. चिक्कोडी तालुका रुग्णालयात दोन्ही आरोपींची आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना चिक्कोडी जेएमएफसी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस आरोपींच्या अधिक चौकशी करण्यासाठी १४ दिवसांची कोठडी मागणार आहेत .