बेळगाव / प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला जिल्ह्यातील धबधबे असलेल्या आणि पर्यटनास जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
धबधब्याजवळ येताना फुटपाथ कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याचे घटना राज्यभरात घडत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्यानजीक हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. याशिवाय कोणत्याही नागरिकांना वनक्षेत्रातील धबधब्यांना भेट देण्यास आधीच प्रतिबंध करण्यात आला आहे.
गोकाकसह जिल्ह्यातील काही प्रसिद्ध धबधबे पर्यटकांना दूरवरून पाहता येणार असल्याचे सांगण्यात आले. धबधब्यावर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, टूर गाईड आणि पोलीस कर्मचारी तैनात आहेत.
धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनीही धोकादायक ठिकाणांची काळजी घ्यावी, अशी विनंती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली आहे.
0 Comments