•  आरसीनगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगाव शहरातील वॉर्ड क्र. ५४ मध्ये सुरूअसलेले उद्यानांच्या पुनर्विकासाचे काम बुडाकडून मनपाकडे हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी नुकतेच आरसीनगर प्लॉट ओनर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

बुडामार्फत वॉर्ड क्रमांक ५४ मध्ये उद्यानांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून आरसीनगर पहिल्या टप्प्यात गेल्या चार महिन्यांपासून  संत गतीने सुरू असलेले काम आता थांबविण्यात आले आहे. उद्यानाच्या अर्धवट कामामुळे रहिवाशांचे हाल होत असल्याने हे काम मनपाकडे हस्तांतरित करावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

यावेळी आरसी नगर प्लॉट ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद गुंजीकर यांच्यासह श्रीकांत देशपांडे आणि नंदकुमार लमाणी उपस्थित होते.