सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील रहिवासी व सध्या बेंगळूर येथे वास्तव्यास असलेल्या भैरवी बाळकृष्ण येळळूरकर या विद्यार्थिनीने मे २०२३ मध्ये झालेल्या सी.ए.च्या अंतिम परीक्षेत उत्तीर्ण होऊन उज्वल यश संपादन करत कुटुंबासह गावाचा नावलौकिक वाढवला आहे.
या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.भैरवी हिचे पदवी पूर्व शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालय क्रमांक १ कुलाबा मुंबई येथे झाले. २०१८ साली जैन युनिव्हर्सिटी बेंगळूर मधून अव्वल श्रेणीत तिने वाणिज्य शाखेची पदवी प्राप्त केली. पदवी घेत असतानाच सी.ए. होण्याचे ध्येय बाळगून तिने सी.ए. परीक्षेचा अभ्यास सुरू केला. या अभ्यासक्रमासाठी तिला के.पी. राव अँड कंपनी बेंगळूर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
भैरवी हिची आई सौ.अश्विनी बाळकृष्ण येळळूरकर ही गृहिणी असून वडील बाळकृष्ण दुदाप्पा येळळूरकर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या असिस्टंट जनरल मॅनेजर पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. तर भाऊ कुणाल याने बी.ई कॉम्प्युटर सायन्सची पदवी प्राप्त केली आहे.
0 Comments