- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे निर्देश
बेळगाव / प्रतिनिधी
बटावडे धबधब्याजवळील जंगल परिसरात दारूबंदीचे उल्लंघन करून मौज मजा केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध यापूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी अन्य चौघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
पर्यटनास बंदी असताना बटावडे धबधब्यानजीक वनपरिक्षेत्रात अधिकारी व डॉक्टरांच्या गटाने ओली पार्टी केल्याप्रकरणी जांबोटी वनपरिक्षेत्रात चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या हेस्कॉमच्या उर्वरित चार कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करावा असे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपवनसंरक्षकांना दिले आहेत.
0 Comments