• अथणी पोलिसांची धडक कारवाई 
  • २६ ट्रॅक्टरसह , ४ जेसीबी आणि  २ टिप्पर जप्त

अथणी / वार्ताहर 

अथणीनजीक कृष्णा नदीत बेकायदा वाळू उत्खनन होत असल्याची तक्रार आली होती. त्या तक्रारीनुसार  जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने धडक कारवाई करून  २६ ट्रॅक्टर, ४ जेसीबी, २ टिप्पर जप्त केले. 

याबाबत माहिती देताना जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील म्हणाले, अथणी पोलिसांना रात्रीच्या वेळी गस्तीवेळी, कृष्णा नदीत अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज ही धडक कारवाई करून बेकायदा वाळू उत्खनन आणि वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनाही  याची माहिती देण्यात आली आहे. संबंधितांवर,कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. 

डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र नायकोडी, डीवायएसपी श्रीपाद जलदे आणि सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता.