बेळगाव / प्रतिनिधी 

मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना उद्या गुरुवारी (२७ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कळविले आहे.

गुरुवारी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केल्याने मुलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाभरातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांना सुट्टी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.