बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांनाही उद्या सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर केली जाते. केवळ खानापूर तालुक्यात शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.
अंगणवाडी केंद्रांनाही सुट्टी
बेळगाव, खानापूर, मुदलगी, सवदत्ती,येरगट्टी आणि तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांनाही बुधवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
0 Comments