- पूरस्थिती आणि नुकसानीची घेतली माहिती
बेळगाव / प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे वेदगंगा नदीत पाण्याची आवक पुन्हा वाढली आहे. हुन्नरगी (ता. चिक्कोडी) येथील लक्ष्मीनारायण मंदिराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी नदीकाठच्या परिसराची पाहणी केली तसेच चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावाला भेट देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, २०१९ साली पूरग्रस्तांसाठी मंजूर झालेल्या घरांना पुराची काळजी करण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच खबरदारीचा उपाय म्हणून योग्य व्यवस्था करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे त्यामुळे चिकोडी तालुक्यातील नद्या - नाले दुथडी भरून वाहत आहेत. वेदगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे पुनर्गी गावातील लक्ष्मीनारायण मंदिरात पुराचे पाणी भरले आहे. वेदगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने मंदिराच्या गाभाऱ्यात रात्रभर पाणी भरले होते. कालपर्यंत सार्वजनिक दर्शनासाठी खुले असलेले हे मंदिर आता पाण्यात बुडाले आहे. मंदिराचा गाभाराही पाण्याने भरला आहे. भाविकांनी पाण्यातून चालत जाऊन देवदर्शन घेतले.महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे कर्नाटकातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments