बेळगाव / प्रतिनिधी
हिरेकुडी श्री कमकुमार नंदी महाराज हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत होते. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चिक्कोडी पोलिसांनी त्यांना आज सोमवारी दुपारी चार वाजता चिक्कोडी शहर वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडिगेर यांच्यासमोर हजर केले. दोघांनाही न्यायाधीश बडिगर यांनी २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे दोन्ही आरोपींना कडेकोट बंदोबस्तात बेळगाव येथील हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले.
चिक्कोडी न्यायालयाच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. त्यामुळे डीवायएसपी बसवराज यलिगार आणि सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0 Comments