• भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांची न्याय मिळवून देण्याची मागणी

खानापूर / प्रतिनिधी 

बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी खानापूर होनकल, गणेबैल दरम्यान महामार्गात जमिनी गेलेल्या ज्या शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. त्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी बेळगाव येथे विशेष बैठक बोलावून शेतकऱ्यांची समस्या जाणून घेतली. दरम्यान खानापूर तालुक्यात अधिक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत अनेक ठिकाणी संपर्क रस्ते अर्धवट आहेत. शिवाय महामार्गाचे कामही अर्धवट असताना गणेबैल टोलनाका सुरू करण्याची घाई करू नये अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादन अधिकारी अनुराधा वस्त्रद यांच्याकडे केली.

सोमवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालय शिव बसव नगर बेळगाव येथे  स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसर अनुराधा वस्त्रद यांची भेट घेऊन महामार्गात शेती केलेल्या शेतकऱ्यांना भरपाई लवकरात लवकर मिळवून द्यावी व होनकल ते रामनगर महामार्ग पूर्ण होईपर्यंत टोल वसुली बंद करावी यासाठी भाजप नेत्यांनी व शेतकऱ्यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वस्त्रद यांनी  शेतकऱ्यांची समस्या दूर करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रधान कार्यदर्शी गुंडू तोपिनकट्टी, भाजप नेते मारुती पाटील यांच्यासह  खानापूर , करंबळ, सावरगाळी येथील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.