- हलात्री वर पाणी तर हेम्मडगा भागाचा संपर्क तुटला
- असोगा मार्गाने वाहतूक सुरू
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात मंगळवारपासून पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून दरवर्षी महापुराने बंद होणाऱ्या खानापूर ते हेम्मडगा मार्गावरील हलत्री नदीवर पाणी आल्याने आज बुधवार सकाळपासून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे.
मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून खानापूर तालुक्याच्या जांबोटी भागात मुसळधार सुरू आहे . त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हालात्री नदीवरील पुलावर बुधवारी सकाळी दोन ते तीन फूट पाणी आले होते. दिवसभर असाच पाऊस सुरू राहिला तर या पुलावरील वाहतूक दिवसभर बंद राहणार आहे.
- असोगा मार्गाने वाहतूक सुरू -
खानापूर अनमोड मार्गावरील हालात्री नदीवर असलेल्या पुलावर पाणी आल्याने खानापूर -अनमोड - गोवा वाहतूक ठप्प झाली आहे. हालात्री नदीवरील ब्रिजवर पाणी आल्याने या भागातील नागरिक पर्यायी मार्ग म्हणून मणतुर्गे खानापूर रस्त्याचा वापर करत आहेत.
- पोलीस खात्याचे आवाहन -
पोलीस विभागाच्या वतीने हा रस्ता बंद करण्यात आला असून, हालात्री नदीवरील पुलावर पाणी आल्याने सदर पुलावरून कोणीही धाडस करून आपला जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन खानापूर पोलिसांनी केले आहे.
0 Comments