कुद्रेमनी दि. २७ जुलै / विनय कदम 

कुद्रेमनी (ता.बेळगाव) ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी मराठा संघटन बेळगावचे तालुका उपाध्यक्ष संजय यल्लाप्पा पाटील यांनी बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी रेणुका नाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

आज गुरुवार दि. २७ जुलै रोजी कुद्रेमनी ग्रामपंचायत अध्यक्ष - उपाध्यक्ष पदासाठी अत्यंत चुरशीने मतदान झाले.अध्यक्षपदासाठी मराठा संघटन बेळगावचे तालुका उपाध्यक्ष संजय यल्लाप्पा पाटील व विमल साखरे यांच्यात लढत झाली. या लढतीत संजय पाटील यांनी सहा मतांनी विमल साखरे यांचा पराभव केला.तर उपाध्यक्षपदी रेणुका नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

यानंतर कुद्रेमनी ग्रामपंचायतीच्या पीडीओ लीला मैत्री व सचिव किल्लेकर, बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी अध्यक्ष विनय कदम यांनी पुष्पहार घालून नूतन अध्यक्ष - उपाध्यक्षांचे स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य मल्लव्वा नामदेव कांबळे, आरती अनंत लोहार, शांताराम कल्लाप्पा पाटील, शिवाजी रामू मुरकुटे, यांनी निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

यावेळी मराठा समाजाचे ईश्वर गुरव, मल्लाप्पा पाटील, नागेश राजगोळकर, अर्जुन जांबोटकर, काशिनाथ गुरव, परशराम कृष्णा पाटील, ज्योतिबा पाटील, विलास गुरव, रवळू पन्हाळकर, मोहन पाटील, विजय पाटील, राजाराम पाटील, राम पन्हाळकर, तानाजी पाटील यांच्यासह इतरांनी  नूतन अध्यक्ष - उपाध्यक्षांचे अभिनंदन केले.