बेळगाव / प्रतिनिधी
कंग्राळी बुद्रुक येथील मार्कंडेय नदीच्या पाण्यात वाढ झाली असून नदीपात्र सोडून रस्त्यावर आलेल्या कासवाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांनी जीवदान दिले. गुरुवारी सकाळी गावातील हद्दीतील वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात असताना ग्रामस्थांना हे कासव सापडले. ग्रामपंचायत सदस्य सुरेश राठोड व उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांनी कासवाला ताब्यात घेतले. यावेळी शेतकऱ्यांसह काही युवक देखील उपस्थित होते.
अंदाजे पाच ते सहा वर्षे वयाचे हे कासव असून अशाप्रकारे मूक प्राणी कुठे आढळल्यास त्यांचे रक्षण करावे, असे आवाहन ग्रामपंचायात उपाध्यक्ष यल्लोजीराव पाटील यांनी केले. यानंतर यल्लोजीराव पाटील आणि सुरेश राठोड यांनी सापडलेल्या कासवाला कंग्राळी येथील तलावात सोडून देत जीवदान दिले.
0 Comments