चिक्कोडी / वार्ताहर
वाळूने भरलेला ट्रक स्वतःहून उलटला, मात्र या अपघातात ट्रक चालक सुखरूप बचावला असून सुदैवाने जीवितहानी टळली. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ चिक्कोडी वाहतूक पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली. चन्नाप्पा गोविंदप्पागोळ असे ट्रक चालकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, ट्रक चालक चन्नाप्पा गोविंदप्पागोळ हा आपल्या ताब्यातील ट्रकने यरगट्टीहून निप्पाणीकडे वाळूची वाहतूक कर होता. दरम्यान निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर ट्रक न्यूट्रल स्थितीत ठेवून तो खाली उतरला होता. काही वेळानंतर अचानक हा टिप्पर महामार्गालगत उलटला. मात्र याआधीच चालक खाली उतरल्याने तो या अपघातातून बचावला आहे .
ट्रक ज्या ठिकाणी पलटी झाला, तिथे दोन छोटी घरे असून, त्यातील माणसे व गुरेही या अपघातातून बचावली आहेत. ट्रक डावीकडे वळण्याऐवजी उजवीकडे वळून महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर उलटल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती. अखेर क्रेनच्या साह्याने ट्रक उचलण्यात आला.
0 Comments