बेळगाव / प्रतिनिधी 

बेळगावचे नूतन प्रादेशिक आयुक्त म्हणून हट्टी गोल्ड माईन्स कंपनी लिमिटेड बेंगळूरचे व्यवस्थापकीय संचालक आयएएस  शेट्टण्णावर एस. बी. यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ दि. ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर राज्य सरकारने प्रभारी प्रादेशिक आयुक्तपदी बेळगाव जिल्हाधिकारी नितेश पाटील आणि बागलकोटच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती.

आता राज्य सरकारने प्रादेशिक आयुक्तपदी शेट्टण्णावर यांची नियुक्ती केली असून सध्याचे प्रभारी प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचा आदेश त्यांना बजाविण्यात आला आहे.