• बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष विनय कदम यांची ग्वाही 
  • कल्लेहोळ श्री गणेश - विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळाला भजन सामग्री सुपूर्द 

 (फोटो सौजन्य  : श्री. विनय विलास कदम)

कल्लेहोळ / विनय विलास कदम 

आपला भारत देश विविधतेने संपन्न आहे. अनादी काळापासून संतांमार्फतचं समाजात आपली संस्कृती जोपासली जात आहे. संस्कृती जोपासण्यात संतांचा मोठा वाटा आहे. तेव्हा संस्कृती जोपासण्यासाठी सर्वतोपरी शक्यती मदत करण्याची ग्वाही बेळगाव ग्रामीण भाजपचे माजी मंडळ अध्यक्ष विनय कदम यांनी दिली. कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील श्री गणेश विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळ, जनता कॉलनी या मंडळाला विनय कदम यांच्या सौजन्यातून हरी भजनसाठी टाळ व सामग्री भेट म्हणून विठ्ठल रुक्मिणी चरणी अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. 

प्रारंभी  गणेशमूर्ती  व भजन सामग्रीचे पूजन करून विनय विलास कदम यांचा श्रीफळ, मानाचा भगवा फेटा देऊन सत्कार करण्यात आला. 


यावेळी ग्रामपंचायत सदस्य रमेश  खन्नूकर, अनिल पाटील, अजित किल्लेदार, विनोद कांबळे, ह. भ. प.  तुकाराम खन्नूकर, तानाजी मरुचे, गोपाळ मरुचे, प्रकाश पाटील, दीपक पाटील, नागो राक्षे, चाळु मरूचे, सागर मरूचे, मल्लाप्पा वेताळ, वैजू मरूचे, भावकू  मरूचे, बाळू कित्तूर, सुरज पाटील, मारुती होनगेकर, शेखर पाटील, मारुती कडेमनी, किसन मरुचे, युवराज मरुचे आदि उपस्थित होते.