बेळगाव / प्रतिनिधी
मागील महिन्यात पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची बदली झाल्यापासून बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस. एन. सिद्धरामाप्पा यांची बेळगाव शहर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिद्धरामाप्पा हे २००५ सालच्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी सीआयडीमध्ये सेवा बजावली होती. बेळगाव शहर पोलीस आयुक्त हे पद आयजीपी पदाची समकक्ष असल्याचे राज्य सरकारने बजावलेल्या आदेशात म्हटले आहे.
0 Comments