- आमदार शशिकला जोल्ले; विमान उभारणी पूर्णत्वाकडे
निपाणी (प्रतिनिधी) : मतदार संघातील मुलांच्यामध्ये राष्ट्रभक्ती आणि देशाअभिमानाची आवड निर्माण व्हावी. सैनिकांच्या शौर्याबद्दल आणि युध्दाबाबात असलेले कुतूहल कायम राहण्यासाठी निपाणीत स्पायडर जेट लढाऊ विमान उपलब्ध करून घेतले आहे. या लढाऊ विमानामुळे निपाणी शहराच्या वैभवात भर पडली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पर्यटकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. विमान प्रतिकृतीचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे भविष्यात हे शहर पर्यटकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल,असा विश्वास आमदार शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केला.
खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून येथील बेळगांव नाक्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात वायुदलातून निवृत झालेले लढाऊ विमान आयएल -३८ ची उभारणी करण्यात आली आहे. या कामाची मंगळवारी (ता.२७)पाहणी करून त्या बोलत होत्या.
आमदार जोल्ले म्हणाल्या, या विमानामुळे निपाणी शहर आणि परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना विमान आणि युध्दाबध्दलची माहिती उपलब्ध होणार आहे. मुलांच्यामध्ये देशाभिमान, राष्ट्रभक्ती, देशप्रेम निर्माण करून व्हावे. देशाच्या संरक्षणासाठी भू-दल वायुदल व नौदलाचे जवान रात्रंदिवस कार्यरत असतात. म्हणूनच आपण आपल्या देशामध्ये घरामध्ये सुरक्षित आहोत. या सर्व गोष्टीची जाणीव मुलांना होऊन त्यांना या सैन्यदबद्दल अभिमान असावा. युध्दात विविध पद्धतीच्या शस्त्रास्त्रे या लढाऊ विमानामध्ये कुठे व कशा पद्धतीने हाताळली जात होती या सर्व गोष्टीची माहिती आजच्या मुलांना माहिती मिळावी, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी करून हे लढाऊ विमान निपाणीमध्ये आणले आहे. निपाणी मतदार संघाचा विकास करीत असताना वेगळेपण निर्माण करण्यासाठी आजपर्यंत खासदार अण्णासाहेब जोल्ले व आपण प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी एस के. सिंग व ३० हून अधिक अभियंत्यांनी काम केले आहे. लवकरच हे लढाऊ विमान सर्वांसाठी खुले होणार आहे. याशिवाय परिसरात उद्यानाची निर्मिती करून विविध प्रकारचे रोपे लावून परिसर सुशोभीत केला जाणार असल्याचे आमदार जोल्ले यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, सभापती राजू गुंदेशा, माजी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, दत्तात्रय जोत्रे,नगरसेविका सोनाली उपाध्ये, अमर उपाध्ये, उपनगराध्यक्ष नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, चंद्रकांत कोठीवाले, अमित साळवे, सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, संतोष सांगावकर, नगरपालिका आयुक्त जगदीश हुलगेज्जी, दत्ता जोत्रे, प्रणव मानवी, रवी कदम, अभय मानवी, राजेश कोठडीया,अमर उपाध्ये, विजय टवळे, प्रशांत केस्ती, प्रसाद औंधकर, रोहित वैद्य, महादेव चव्हाण यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments