- रायबाग तालुक्याच्या नंदीकुरळी गावातील घटना
रायबाग / वार्ताहर
अंगणवाडीच्या छताला केलेल्या गिलाव्याचा काही भाग कोसळून लहान मुले किरकोळ जखमी झाली. नंदीकुरळी (ता. रायबाग जि. बेळगाव) येथे घटना घडली. सुदैवाने या घटनेत बालकांना कोणतीही गंभीर दुखापत न झाल्याने जीवित हानी टळली.
गेल्या वर्षीच नरेगा योजनेअंतर्गत ११. ६० लाख रू. खर्चून सदर अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र या घटनेनंतर हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
पीडीओ ए. ए. दिलावर यांच्या विरोधात ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या आठवड्यात घडलेली ही घटना उशिरा उघडकीस आली. यानंतर सीडीपीओ रायबाग यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू आहे.
0 Comments