- येळळूर रोडवरील त्या मनोरुग्ण महिलेची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रवानगी
- सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांचा पुढाकार
बेळगाव / प्रतिनिधी
येळळूर मार्गावर गोंधळ घालून वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरलेल्या त्या मनोरुग्ण महिलेला अखेर सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांच्या सहकार्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याबाबत प्राप्त माहितीनुसार सदर महिलेने आज सकाळच्या सुमारास येळळूर मार्गावर बराच गोंधळ घातला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही निर्माण झाली होती. ही बाब सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोहोचताचं सदर मनोरुग्ण महिलेच्या अंगावर व्यवस्थित कपडे नसल्याचे त्यांनी पाहिले.
यावेळी सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी सदर महिलेसाठी कपड्यांची व्यवस्था केली आणि नंतर रुग्णवाहिकेच्या मदतीने अधिक उपचारासाठी तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार झाल्यानंतर तिला मानसोपचार केंद्रात दाखल करण्यात येणार आहे. या कार्यात गंगाधर पाटील यांना मुक्ताबाई खुराटे, बाळू बडगावी, चिन्मय मणी, विश्वकर्मा उपाध्याय आणि अवधूत यांनी सहकार्य केले.
0 Comments