बेळगाव / प्रतिनिधी 

बेकायदा मालमत्ता संपादन प्रकरणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकले आहेत. बेळगाव, बागलकोट,यादगिरी,कलबुर्गी, रायचूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक धाड घालून तपासणी सुरू आहे.

याशिवाय बेंगळूर (ग्रामीण), बेंगळूर (शहर), रामनगर, तुमकुर शहरातही लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापे घालून तपासणी केली आहे.तुमकुर येथील कृषी विभागाचे जेडी रवी यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी धाड घातली आहे. हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता शेखर बहुरूपी यांच्या रामतीर्थनगर बेळगाव येथील घरावर धाड घालण्यात आली आहे.

शेखर बहुरूपी हे हरपनहळळी, बेळळारी येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. सन २०१९ साली अथणी कार्यरत असताना पूरग्रस्त घोटाळ्यात बहुरूपी यांना निलंबित करण्यात आले होते. 

अधिकाऱ्यांनी सकाळी धाड घालून बेकायदेशीर संपत्ती शोधण्यास सुरुवात केली आहे. तसेच बागलकोट कृषी जेडीच्या घरावरही छापा टाकून तपासणी करण्यात आली.