- जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
- बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बैठक
बेळगाव / प्रतिनिधी
बकरी ईद सण येत्या (२९ जून) रोजी होणार असून, त्यानिमित्ताने जनावरांची अनधिकृत हत्या किंवा तस्करी रोखण्यासाठी कडक उपाययोजना राबवाव्यात. सण साजरे करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांचे सक्तीने पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिल्या.
बकरी ईदच्या काळात गायी, उंटांसह प्राण्यांची होणारी हत्या रोखण्यासाठी शासनाने स्थापन केलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, अधिकाऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमानुसार कार्यवाही करावी, दि. २९ जून रोजी बकरी ईदचा सण साजरा केला जाणार आहे, त्यादरम्यान जनावरांची अवैधरित्या होणारी तस्करी आणि सामूहिक कत्तलीवर जातीनिशी लक्ष ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
याबाबत योग्य ती माहिती देऊन जनतेला नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करावे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, महानगरपालिकेच्या अखत्यारीतील दोन कत्तलखाने बकरी ईदच्या वेळी वापरण्याची सोय करण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सव शांततेत साजरा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
याशिवाय ज्या ठिकाणी सामूहिक प्रार्थना होते त्या ठिकाणी लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे सणासुदीच्या दिवशी आदल्या दिवशी शहरात पाणीपुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना द्याव्यात,अशी सूचना त्यांनी बैठकीत केली.
0 Comments