खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात लोककलांना जागृती देत एक उत्तम कलावंत आणि कलाकुसरतेचा अभ्यासक लोककलावंत अभिजीत द. कालेकर यांना तेजस फाउंडेशन नाशिक यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कलारत्न पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे गुरुवार दि. २२ जून २०२३ रोजी हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
अभिजीत कालेकर हे एक खानापूर तालुक्यातील उत्तम कलाकार आहेत. मराठी लोक संस्कृतीची जोपासना, त्यासाठी केलेलं कार्य, आणि कलेच्या सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सर्व श्री प्राध्यापक बापू देसाई, नाना चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या रंजीता तोर, तेजसच्या अध्यक्षा सौ. मेघा डोळस, महेंद्र तुपे, निवेदक श्री पंकज शिंदे, प्रा.अजिंक्य लिंगायत आदि मान्यवर उपस्थित होते.
0 Comments