• बेळगावच्या कायदा सुव्यवस्था पोलीस उपायुक्तपदी एच. शेखर यांची नियुक्ती 

  • राज्य सरकारकडून आदेश जारी 

बेळगाव / प्रतिनिधी

राज्य सरकारने बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्या बदलीचा आदेश जारी केला आहे. त्यांच्याजागी एच.शेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवींद्र गडादी यांची डीसीपी कमांड सेंटर बेंगळूर  येथे बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे एसीपी एन. व्ही.बरमणी यांची बागलकोट जिल्ह्यातील हूनगुंड उपविभागात आणि ग्रामीण एसीपी एस.व्ही. गिरीश यांची हुबळी धारवाड सीसीबी मध्ये बदली करण्यात आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या अचानक केलेल्या बदल्यांबाबतची  सविस्तर माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.